ज्ञानेश्वर महाराज सहस्र अभंगावली
प्रकरण
– १
(१)
अनुपम्य मनोहर । कासे शोभे पितांबर ।। चरणी
ब्रीदाचा तोडर । देखिला देवी ।।१।। योगियांचा कसवटी । दावितसे नेत्रपुटीं ।। उभा
भिवरेच्या तटीं । देखिला देवो ।।२।। बापरखुमादेवीवरू । पुंडलिका अभयकरू ।।
परब्रह्म साहाकरू । देखिला देवो ।।३।।
(२)
सत्य
ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण ।नाही रूप गुण वर्ण जेथें ।।१।। तो हा रे श्रीहरी
पाहिला डोळेभरी। पाहते पाहणे दुरी सारोनियां।।२।। ज्ञानदेव म्हणे ज्योतीची
निजज्योती। ते हे उभी मूर्ती विटेवरी ।।३।।
**************************************
गणेश
वंदन
(३)
दोही देहाचे चर्म श्रवण । भक्ति उपदेश दोन
श्रवण । पाँचवां अगम्य श्रवण । तो गजानन आता पूजूं ।।१।। ध्यान मनन दोन्ही करा ।
देता बोधिता चतुष्टवरा । मंगलदायक वटेश्र्वरा । पूजूं आतां ।।२।। भजन दोंदिल
विद्याधरा । सकळशुंङासंवरूपाकरा । चिदानंद दिगंबरा । पूजूं आता ।।३।। मुकुट
माथां निव्रूत्तिसार । विद्या आभ्यासितां ज्ञानेश्र्वर । सकळ अभ्यासाचा नरकुंजर ।
पूजूं आता ।।४।। पुण्यपावन दोन्ही चरण । वैराग्य अनुष्ठान सव्य
साधन अनेक भूषणें गजानन । सार निधान पूजूं आता ।।५।।
(४)
सरस्वतिचा गणाधीशा। महामतीचा पूर्ण प्रकाशा।
रिध्दिसिध्दिचा जगदिशा। पूजूं आता।।१।। नागेश वेढा चक्राकार। श्रुतिगुजाचा
महेश्र्वर। निव्रुत्ति पूजूं आता।।२।।
क्रुतांत दंता काळेश्र्वरा। नीळ निव्रुत्ति ज्ञानेश्र्वरा। सिध्दिविनायका
आदि ईश्र्वरा। पूजूं आता।।३।।
(५)
मुक्तमाळा
भव्यभूषणा।श्रुति नेति गजानना।तुझिया अंगीच्या ना ना भूषणा।कोण
वर्णी।।१।।प्रेमळपुष्पें दुर्वांकुरना।आभासनयना अगम्य
दर्शना।मुंगिमात्राचियाप्राणा।फरशधरा।।२।।सद्गुरू बोध प्रांजळा।मोदक बोध
क्रुपाळा।गौरीनंदना घननीळा।मेघशामा।।३।।निव्रुत्तिगुह्याचिया
महामंत्रा।ज्ञानेश्र्वराचा करूणाकरा।तुझिया अगोचर उपचारा।काय वर्णू।।४।।
(६)
अविनाशा
अक्षयीं विधि । प्रेमळाच्या साधक सिध्दि। तुझे जाणतेपण वेदीं । नेेणविजे ।।१।। तूं
श्रेष्ठांचे मंगलघाम । तुझियाने पठण पुराण । तुझे नाम आम्हां पावन । तिन्ही लोकीं
।।२।। तुझियानें भक्ति मुक्ति । तुझियाने चाले स्फूर्ति । तुझे नाम त्रिजगती पावन
आम्हां ।।३।। तुझियाने आम्हां संसार । तुझियाने तारक विचार । तुझियाने हा संसार
। सार झाला ।।४।। गुरूकुळस्वामिया गणपति ।
ज्ञानेश्र्वराची मंगळमूर्ति । तुझिया क्रुपेने तटस्थ पावति समाधान ।।५।।
(७)
अविट
अमला नभभूषणा । अनंत लोचना गजानना । पतित पावना दर्शना। योग्य तुझिया।।१।।तोडर घंटा विविध विमळा । समाधि समाधानाच्या स्थळा । निर्विंकार निर्गुण निर्मळा। सार तूंचि ।।२।। द्याळ अनाथनाथा । जंगम स्थावर गुह्य धूपा । पूर्ण व्यापक प्रकाशदीपा ब्रह्मा तूंचि ।।३।। निव्रुत्तिगमनाच्या सिध्दिपंथा । ज्ञानेश्र्वराची उन्मनी अवस्था । तुझिया स्वरूपाची कुसुमकांंता । झळको लागे ।।४।।
********************************************************
********************************************************
.png)

No comments:
Post a Comment